
नगराध्यक्षपदासाठी तीन, नगरसेवकपदासाठी ३३ उमेदवार
चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती
चिपळूण ) : चिपळूण नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून सोमवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शहरातील धवल घाग सभागृह येथे दिवसभर ही मुलाखत प्रक्रिया पार पडली.
नगराध्यक्ष पदासाठी ३, तर नगरसेवक पदासाठी ३३ इच्छुकांनी या मुलाखतीत सहभाग घेतला. इच्छुकांच्या पार्श्वभूमी, कार्यकर्तृत्व आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्क या सर्व बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.
या मुलाखतींमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष व निवडणूक निरीक्षक रामचंद्र दळवी, सरचिटणीस शशांक बावस्कर, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस श्रद्धा ठाकूर, तसेच जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग उपस्थित होते.
चिपळूण नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे, तर नगरसेवक पदांसाठी एकूण २८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उमेदवार निवडीची प्रक्रिया गतिमान केली असून, लवकरच अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.




