
दीपोत्सव कार्यक्रमात गडकिल्ल्यांवर उजळली स्वराज्याची ज्योत

रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभागाच्या वतीने शुक्रवारी स्वराज्याच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देणारा भव्य दीपोत्सव कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात विभागाध्यक्ष दीपेश विठ्ठल वारंग, सांस्कृतिक विभाग प्रमुख समृद्धी कुमार चाळके, विभाग प्रमुख मयुर भितळे, संपर्क प्रमुख तन्मय जाधव यांच्यासह रणरागिणी आणि मावळे उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे खुशी गोताड, रुची गोताड, भूमिका चंदरकर, श्वेता भितळे, रश्मी जाधव, आकांक्षा पिलणकर, ऋतुराज पिलणकर, ऋता चव्हाण, नयन कदम, अंकुर मांडवकर, यश चव्हाण, ओमकार सावंत देसाई, सक्षम शिंदे, आकाश मालगुंडकर, शर्विल भितळे, सौरव बळकटे, स्वरूप बळकटे, सचिन कळंबटे आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
तसेच पत्रकार अलका माने, शिवप्रतिष्ठान रत्नागिरी विभागाचे जयदीप साळवी, जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर, सदस्य परशुराम शिंदे, स्वयंम नायर व हिंदू राष्ट्र सेना रत्नागिरी विभाग अभी माने यांचीही उपस्थिती लाभली.
आर्य मोरे, पृथ्वेश पासवकर, प्रतीक जाधव, ओम, तेजस, तन्वी व तुकाराम पाटील कुटुंब, शशिकांत व शुभांगी जाधव, कलावती देसाई, ऋषिकेश पाडाळकर आदी ग्रामस्थानी कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी रत्नागिरी पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले.
दीपोत्सवात हजारो दिव्यांनी उजळलेल्या गडावर “जय शिवराय”च्या घोषणा घुमल्या आणि स्वराज्यभावनेने वातावरण भारावून गेले.




