
थिबा राजाकालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा पाठिंबा…
: थिबा राजाकालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाचा भाग म्हणून आज रत्नागिरीत विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी पोलिस अधीक्षक बंगल्या जवळील थिबा कालीन बुद्ध विहारापासून मोर्चाला सुरुवात झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर याचा समारोप करण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता सहभागी झाली होती. दरम्यान समारोपीय सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी हजेरी लाऊन पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचा संदेश आंदोलकांपर्यंत पोहचवला. यापूर्वी माने यांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले.




