
डिंगणी ग्रामस्थांची एस.टी महामंडळाला धडक
एसटी वेळेतच सोडण्याची मागणी....
संगमेश्वर : संगमेश्वर-डिंगणी-खाडेवाडी-गुरववाडी एसटी बस वेळेत सुटत नसल्याने गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा फटका गोर गरीब शेतकरी, कष्टकरी, वयोरुद्ध, शाळेतील मुले यांना बसत आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रविवारी डिंगणी अगरवाडी येथे बैठक घेऊन खाडेवाडी, अगरवाडी, करंडेवाडी, काष्टेवाडी, जाधववाडी, क्रांतीनगर (वरची बौद्धवाडी) येथील ग्रामस्थांनी संगमेश्वर आणि देवरुख आगाराला आक्रमक पवित्रा घेत भेट घेऊन निवेदन दिले. जर ही गाडी वेळेत नाही सुटली तर सर्व गावाला घेऊन आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे.
यावेळी गावकर वामन काष्टे, गावकर श्रीपत खाडे, गावकर आणि माजी पोलीस पाटील पांडुरंग पेजे, करंडेवाडी वाडीप्रमुख यशवंत करंडे, क्रांतीनगर अध्यक्ष बुद्धदास कदम, माजी सरपंच तुकाराम पाकतेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन मोहिते, पोलीस पाटील जितेंद्र जोगळे, कृष्णा खाडे, अनंत काष्टे, विश्वनाथ जोगळे, विवेक मोहिते, प्रकाश जाधव, चंद्रकांत गावडे, विजय जाधव, विशाल कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




