
जिल्ह्यातील ५०० शिक्षक अतिरिक्त ठरणार
शालेय शिक्षण क्रीडा विभागाने महापुराचे कारण पुढे करून संच मान्यतेसाठी दि. ३० सप्टेंबरऐवजी सरसकट २० ऑक्टोबरची पटसंख्या ग्राह्य धरण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला आहे. हा निर्णय शिक्षकांच्या पदांवर, मराठी शाळांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. या निर्णयाने हजारो शिक्षकांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. तसेच जिल्ह्यातील ५०० पेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे..
www.konkantoday.com




