
खेड ग्रामीण भागात धावणार्या ४० बसफेर्या ४ नोव्हेंबरपर्यंत रद्द
खेड बसस्थानकातून ग्रामीण भागात धावणार्या ४० बसफेर्या २२ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. खेड आगारातून विशेष बससेवेसह पंढरपूर यात्रेसाठी बसफेर्या रवाना होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना १४ दिवस मोठा फटका बसणार आहे.
रद्द बसफेर्यांमध्ये खेड-वाडीजैतापूर, खेड-शेरवली, खेड-बिजघर, खेड-तुळशी, खेड-दयाळ, खेड-वावे, खेड-शिरगाव, खेड-पन्हाळजे, खेड-कशेडी, खेड-माणी, खेड-किंजळेतर्फे नातू, खेड-पांगरी, खेड-मौजे जैतापूर, खेड-वाक्षेपवाडी, खेड-संगलट, खेड-वडगाव, खेड-बिरमणी, खेड-शिल्डी, खेड-तिसंगी, खेड-रसाळगड आदी बसफेर्यांचा समावेश आहे.www.konkantoday.com



