
इब्राहिम क्लिनिक डे केअर सेंटर उद्घाटन कार्यक्रम
उद्यमनगर, रत्नागिरी येथे इब्राहिम क्लिनिक डे केअर सेंटर च्या उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले की, शिरगावसारख्या ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा डॉ. वलिद पावसकर यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे. दहा बेडचे हॉस्पिटल उभारणे ही एक धाडसी आणि समाजसेवेची वाटचाल आहे. त्यांच्या हातातील कौशल्य आणि सेवाभाव यामुळे अनेक रुग्णांना नवीन जीवन मिळेल, याची मला खात्री आहे.
आरोग्यसेवेतून समाजसेवा करण्याच्या या प्रयत्नाबद्दल डॉ. पावसकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! त्यांनी हे हॉस्पिटल कोकणातील एक उत्कृष्ट आरोग्यसेवा केंद्र म्हणून विकसित करावे, अशी इच्छा मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी राहुलजी पंडित, बंड्याशेठ साळवी, सुदेशजी मयेकर, पावसकर मॅडम तसेच उपस्थित मान्यवर, बांधव व भगिनी उपस्थित होते.




