
संपर्क युनिक फाउंडेशन च्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ…
रत्नागिरी:
सामाजिक कार्य करीत असलेल्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे नूतन कार्यालयाचा शुभारंभ माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांच्या हस्ते करण्यात आले.
जावकर प्लाझा, जयस्तंभ रत्नागिरी येथे कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ शेजारी आणि युनियन बँकेच्या खाली तळमजल्यावर येथे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे प्रशासकीय कामकाज करण्यासाठी या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
संस्थेचे सामाजिक कार्य हे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण मदत केंद्र येथून अहोरात्र सुरू आहे,मात्र संस्थेचे दैनंदिन कामासाठी आणि सभा घेण्यासाठी कार्यालय अवश्य होते ही गरज ओळखून सुहेल मुकादम यांनी ही जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.या कार्यालयात आश्रय जेष्ठ नागरिक संघटना रत्नागिरी चे कामकाज ही सुरु राहील.यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी व आश्रय जेष्ठ नागरिक संघटना रत्नागिरी चे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.तरी नागरिकांनी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेमध्ये या नूतन कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष शकील गवाणकर यांनी केले.




