
लोटे औद्योगिक वसाहतीतील काही कारखाने सांडपाणी सोडत असल्याने दाभोळच्या खाडीच्या पाण्याचा रंग लाल झाला…
चिपळूण बड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांनी बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा उठवत आपले सांडपाणी सीईटीपीमध्ये न सोडता थेट नाल्यामध्ये सोडले. परिणामी ते पाणी पुढे सोनपात्रा आणि जगबुडीच्या माध्यमातून थेट दाभोळ खाडीत मिसळले गेल्याने गडद लालसर रंगाच्या फाटलेल्या पाण्याने गुरुवारी सर्वत्र खळबळ उडाली. याप्रकरणी दाभोळ खाडी संघर्ष समिती आक्रमक झाली असून दोषी कारखान्यांवर कारवाई न झाल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या महिनाभरात नाल्याद्वारे सांडपाणी सोडले गेल्याचा हा तिसरा प्रकार आहे. मात्र तरीही बिनधास्तपणे पाणी सोडणार्या कारखान्यांवर कारवाई होत नसल्याने प्रकार वाढत चालले आहेत. आठवडाभरापूर्वीच एका नामांकित कंपनीने आपले सांडपाणी नाल्यात सोडले होते. बुधवारी रात्रीपासून पुन्हा त्याच कंपनीतून रासायनिक सांडपाणी सोडले गेल असल्याचा आरोप केला जात आहे.www.konkantoday.com




