
दारूचे व्यसन आणि शारीरिक अपंगत्वामुळे लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
दारूचे व्यसन आणि शारीरिक अपंगत्वामुळे लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथे २५ ऑक्टोबर रोजी घडली आहे.
मकरंद कृष्णा पाल्ये (वय ३२ वर्षे, रा. वांद्री कुणबीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मकरंद पाल्ये याला दारू पिण्याचे व्यसन होते, तसेच त्याचा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान असल्याने तो अपंग होता. या अपंगत्वामुळे त्याचे लग्न ठरत नव्हते, या गोष्टीचे त्याला प्रचंड नैराश्य आले होते.
या नैराश्यातूनच मकरंद याने २५ऑक्टोबर रोजी सकाळी ०९.०० वाजल्यापासून ते दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान वांद्री कुणबीवाडी येथील त्याच्या राहत्या घराच्या खोलीतील पंख्याच्या वर असलेल्या लोखंडी चॅनलला नायलॉनची रस्सी बांधून गळफास घेतला.



