
लोकांना अपहरणाचा संशय मात्र पोलीस चौकशीत निघाले पती-पत्नीचे भांडण
दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने दापोलीत पर्यटकांची वर्दळ वाढलेली असतानाच बुधवारी एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. हर्णेमध्ये एका महिलेला जबरदस्तीने गाडीत बसवून नेण्यात येत असल्याचे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांना अपहारणचा संशय आला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर काही क्षणातच संपूर्ण परिसरात अलर्ट जारी केला. बुरोंडी नाका येथे नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू झाली. यामध्ये सदरची गाडी सापडल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत हा प्रकार अपहरण नंसून पती-पत्नीतील भांडणातून घडलेला असल्याचे समोर आले.
बुधवारी दुपारी काही पर्यटक हर्णे येथे फिरत असताना अचानक एक व्यक्ती एका महिलेला थांबलेल्या कारमध्ये जबरदस्तीने बसवताना दिसला. दृश्य पाहताच काही नागरिकांनी विलंब न लावता दापोली पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानुसार दापोली पोलिसांनी त्वरीत हालचाली करत बुरोंडी नाका येथे नाकाबंदी केली. काही मिनिटांतच सबंधित कार हाती लागली आणि वाहनातील व्यक्तींना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.www.konkantoday.com




