
रत्नागिरी शहरातील बोर्डीग रोड येथे वीज वाहिनीवर झाड कोसळले, अनर्थ टळला
रत्नागिरी शहरातील बोर्डीग रोड येथील बीएसएनएल कार्यालयासमोरच्या बागेतील जुने झाड विद्युत बाहिनीवर कोसळले. यामुळे वीजखांब मोडून पडला. परिणामी परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सुदैवाने कोणतीही हानी झाली नसल्याने अनर्थ टळला. तरी, ऐन दिवाळीच्या सणात रहिवाशांना अंधारात रहावे लागल्याने मोठी गैरसोय झाली होती. या घटनेची माहिती तातडीने महावितरण कर्मचारी व न. प. अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानुसार न.प. कर्मचार्यांनी झाड बाजूला केल्यानंतर महावितरण कर्मचार्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला.
www.konkantoday.com




