
रत्नागिरी जिल्ह्यातील बालकाश्रमांचे दोन वर्षांचे अनुदान रखडले…
रत्नागिरी जिल्हयातील बालकाश्रमांच्या आर्थिक अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासनाकडून देण्यात येणारे वार्षिक अनुदान गेली दोन वर्षे रखडले असल्याने या संस्थांचे व्यवस्थापन प्रचंड अडचणीत आले आहे. अनुदान रखडल्याने बालकाश्रमामध्ये राहणार्या मुलांच्या भोजनाचाही प्रश्न निर्माण झाला असून निराधार मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे.
बालकाश्र हे निराधार मुलांना आधार देण्याचे काम करतात. त्यांना शिक्षण तसेच इतर आवश्यक गोष्टी देऊन त्यांचे भविष्य घडविण्यास मदत करतात. अनाथ व निराधार मुलांना बालकाश्रमांच्या माध्यमातून आधार मिळत आहे. शासकीय अनुदान तसेच समाजातील दानशूर व्यक्तींकडून मिळणारी मदत यावर या बालकाश्रमांचा कारभार सुरू आहे. मात्र गेली दोन वर्ष शासनाकडून अशा मुलांच्या संगोपनासाठी बालकाश्रमांना दिले जाणारे अनुदानच मिळालेले नाही. त्यामुळे बालकाश्रम आर्थिक अडचणींमध्ये सापडले आहेत.
मागील दोन आर्थिक वर्षांपासून अनुदानाचे वितरण न झाल्याने संस्थांना दैनंदिन खर्च, अन्नधान्य, वसतिगृह देखभाल व कर्मचार्यांचे वेतन देणे कठीण झाले आहे. बालकल्याण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधी मिळालेला नाही. परिणामी काही संस्थांना देणग्या आणि उधारीवर व्यवस्था चालवावी लागत आहे. काही ठिकाणी विद्यार्थी आणि कर्मचारी यांना मूलभूत सोयीसुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान वेळेवर जमा न झाल्यास बालकाश्रमातील मुलांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com




