
मुंबई-गोवा महामार्गावर सलग पाचव्या दिवशी वाहतूक कोंडी; ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
दिवाळीच्या सुट्टीमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमानी आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत असून मुंबई-गोवा महामार्गावर सलग पाचव्या दिवशी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.माणगाव शहरापासून तिलोरे फाट्यापर्यंत चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे महामार्गावर वाहनांची कासवगतीने चाल होत आहे. पुण्याहून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवरही अशाच प्रकारे वाहतूक कोंडीचे चित्र दिसून येत आहे.




