
पिंपळी पूल पुनर्बाधणीबाबत एमआयडीसी उदासीन भूमिका, कारखाने बंद पडण्याची वेळ
पिंपळी-नांदिवसे रस्त्यावरील पुल खचल्यानंतर दान महिने उलटले तरीही नवीन पूल पुनर्बाधणीबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची जबाबदारी घेणारी एमआयडीसी यापाबत कमालीची उदासीन असल्याने कारखाने बंद पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तत्काळ समांतर मार्ग न काढल्यास एमआयडीसी कार्यालयासमोर बिमुदत ठिय्या आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले, या रस्त्यावरील दोन्ही पूल खचल्याने दोन महिने पूर्ण झाले आहेत या दोन्ही पुलांच्या पुनर्बाधणीची जवाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र या दोन महिन्यांच्या कालावधीत कोणतीही ठोस हालचाल किंवा कामाची सुरुवात झालेली दिसून आली नाही या निष्क्रियतेचा थेट परिणाम परिसरातील उद्योग-व्यवसायांवर आणि स्थानिक रोजगारांवर मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे.www.konkantoday.com




