
’दापोलीतील फंड’ घोटाळ्याची पोलिसांमार्फत चौकशी सुरू
दापोली शहरात दापोली फंड’ नावाने अवैध आर्थिक देवाण-घेवाण करणार्या गटाविरोधात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात सुमारे अनेकांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असून दिवाळीनंतर गुन्हा दाखल करुन दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून काही स्थानिकांनी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील कर्मचार्यांनी व्हॉट्सऍप ग्रुपद्वारे रोकड स्वरुपात फंड गोळा करुन लाखो रुपयांची उलाढाल केली होती. कोणतेही बँक व्यवहार न करता फक्त रोखीनेच व्यवहार होत असल्याने तपासाचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या फंडाचे सूत्रधार म्हणून एका चालकाचे नाव समोर आले असून त्याने नातेवाईकांच्या नावावर मालमत्ता घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारीनुसार चौकशी सुरू असल्याचे दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी सांगितले. दिवाळीनंतर चौकशीला वेग देऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com




