
ग्रामीण भागातून डॉक्टर होण्याचा मान — डॉ. आदित्य गोरिवले यांचे अभिमानास्पद यश!
,✍️ राजू सागवेकर |राजापूर
राजापूर तालुक्यातील जैतापूर दळे दशक्रोशीतील ग्रामस्थ आणि नागरिकांकडून डॉ. आदित्य विजय गोरिवले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
दळे गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य तसेच जैतापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय गोरिवले यांचे चिरंजीव डॉ. आदित्य गोरिवले यांनी श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, बेळगाव येथून साडेचार वर्षांचा BHMS वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.
डॉ. आदित्य यांनी आपले प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा दळे येथे घेतले. पुढील शिक्षण जैतापूर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय, जैतापूर येथे पूर्ण केले. इयत्ता बारावी विज्ञान शिक्षण त्यांनी राजापूर हायस्कूल, राजापूर येथे पूर्ण केले.
ग्रामीण भागातील दळे येथून वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होण्याचा मान डॉ. आदित्य गोरिवले यांनी मिळविला आहे, याचा ग्रामस्थांना अभिमान वाटतो.
यावेळी सौ. दिपा दिवाकर आडविरकर यांनी डॉ. आदित्य यांचे औक्षण केले, तसेच आडविरकर गुरुजी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




