स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दोन टप्प्यात?


महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून ठप्प पडलेले ” आपल्या गावात आपले सरकार ” आता अस्तित्वात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थयांच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संबंधात सुरू केलेल्या तयारी नुसार निवडणूक मतदान यंत्रांची उपलब्धता वाढल्याने आता चार टप्प्याऐवजी महाराष्ट्रातील निवडणुका केवळ दोन टप्प्यात होणार असल्याचे समजते.

नोव्हेंबर 10 ते 15 या तारखे दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषदा, सर्व नगरपालिका आणि नगरपरिषदा यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होईल तर मुंबईसह दुसऱ्या टप्प्यातील महानगरपालिकच्या निवडणुका होतील. या निवडणुका सध्याच्या सदोष मतदार याद्यानुसार होऊ नये तर संपूर्ण याद्या बदलून त्या घ्याव्यात अशी मागणी महाविकास आघाडी तर्फे केली जाते आहे. या संदर्भात एक नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षांनी संयुक्त मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर याद्यांमधील कोणत्याही त्रुटी निवडणूक प्रक्रिया मागे ठेवण्यात या मोठ्या नाही.

ज्या नागरिकांना किंवा राजकीय पक्षांना याबद्दल आक्षेप नोंदवायचे आहेत ते नियमानुसार प्रक्रिया सुरू करू शकतात अशी भूमिका आयोग घेईल असे समजते गेल्या काही वर्षात निवडणुका न झाल्याने नागरिक या मतहक्काची प्रतीक्षा करत आहेत असे काही पक्षाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकांची घोषणा दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान होणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button