
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिलारी मुख्य वसाहतीच्या पुलाजवळ रक्ताने माखलेल्या अवस्थेत कार आढळले मात्र आतील माणसांचा व पत्ता नाही पोलिसांकडून शोध सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिलारी मुख्य वसाहतीच्या पुलाजवळ रक्ताने माखलेल्या अवस्थेत कार आढळून आली आणि एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या कारची नंबरप्लेट नसल्याने संशय अधिकच बळावला. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असला तरी, हा घातपात आहे की अपघात?याबाबत मात्र अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.तिलारी धरणाच्या पाण्याचा विसर्ग पुच्छ कालव्याद्वारे केला जातो. या कालव्यावर मुख्य वसाहतीजवळ एक पूल बांधला गेला आहे. या पुलाजवळ अनेक ग्रामस्थ सकाळ, सायंकाळच्या सुमारास टेहळणीसाठी येत असतात. गुरूवारी सकाळी टेहळणीसाठी आलेल्या काही ग्रामस्थांना या पुलानजीक कार आढळून आली. कार कोणाची असावी हे जवळून पाहण्यासाठी गेले असता आत मध्ये रक्ताचे शिंतोडे पडलेले त्यांना दिसले. हे पाहताच ग्रामस्थ घाबरले व तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ही घटना कळताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली शेवटीयाची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसही लगेच घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी कारमध्ये रक्त पडलेले त्यांना दिसले, मात्र गाडीत कोणतीही व्यक्ती दिसून आली नाही. विशेष म्हणजे या कारची नंबरप्लेट नसल्याने ती कोणाची असावी, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.




