
रेल्वेतून पडून जखमी झालेल्या दिल्ली येथील प्रवाशाचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू
संगमेश्वर येथे रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या दिल्ली येथील अस्लम कासम अल्ली या ३५ वर्षीय तरुणाचा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. संगमेश्वर रेल्वेस्टेशन जवळ रेल्वे कर्मचार्याला रेल्वे रुळावर रेल्वेतून पडून दुखापत झालेल्या स्थितीत एक तरुण दिसून आला. याची माहिती पोलिसांना समजताच त्या ठिकाणी दाखल होत त्या जखमी तरुणाला उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याला मृत घोषित केले. मृत झालेल्या ३५ वर्षीय तरुणाचे नाव अस्लम कासम अल्ली असे असून तो दिल्ली येथील आहे.




