
रायगडात मुलींचा जन्मदर घटला; एक हजार मुलांमागे फक्त ९७७ मुली,
रायगड जिल्ह्यात एक हजार मुलांमागे फक्त ९७७ मुली असल्याचे आढळून आले आहे. मुलींचा जन्मदर वाढत असला तरी मुलांच्या तुलनेने तो कमी असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ९७७ मुलींचा जन्म झाला.मुलगा व मुलगी समान असल्याचा संदेश देण्यात येत असला तरी प्रत्यक्षात अजूनही मुलांपेक्षा मुलीच्या जन्माचे प्रमाण बरोबरीने असल्याचे दिसून येत नाही त्यामुळे रायगडकरांना मुलगी नकोशी झाली आहे काय असा सवाल विचार जात आहे.
वंशाचा दिवा म्हणून काहीजण मुलाचाच आग्रह धरत असल्याने जिल्ह्यात आजही जन्माला येणाऱ्या मुले आणि मुलींची संख्या समसमान होऊ शकली नाही मुलगी परक्याचे धन मानून मुलासाठी हट्ट धरणारी दाम्पत्ये आजही समाजात आहेत. सोनोग्राफीद्वारे गर्भातच असणाऱ्या बाळाचे लिंगनिदान करून मुलगाच असल्याची खात्रीही करून घेतली जात असल्याचे दिसून येते. बेकायदा गर्भनिदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विविध उपाययोजना तसेच कठोर कायदे करण्यात येत आहेत. गर्भनिदान करू नये यासाठी जनजागृतीदेखील केली जाते.




