
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी जिल्हा पोलीस सरसावले


सध्या सुट्टीचा हंगाम असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विविध भागातून पर्यटक कोकणात आले आहेत कोकणातील नयनरम्य समुद्रकिनारे हे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहेत त्यामुळे जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने भरून गेले आहेत.


पोलिसांनी बंदी घालू नही काही अति उत्साही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर फोर व्हीलर समुद्राच्या पाण्यात नेत आहेत हर्णे किनारी असा प्रकार घडल्यानंतर आता पोलिसांनी तातडीने पावले उचलले आहेत.


जिल्ह्यातील किनाऱ्यावर पर्यटकांनी मोठी वाहने नेऊ नयेत यासाठी आता बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत याशिवाय मोठ्या प्रमाणावर पुरुष महिला मुले अशी पर्यटकांची गर्दी समुद्रकिनाऱ्यावर झाली आहे या पर्यटकांना कोणताही धोका होऊ नये व त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस मोठ्या प्रमाणावर समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालत आहेत किनाऱ्यावर सायकल व इतर माध्यमातून पोलिसांची गस्त सुरू असल्याने पर्यटका नाही सुरक्षित वाटत आहे पोलिसांच्या या कामगिरीचे पर्यटकांकडून स्वागत करण्यात येत आहे.





