
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना विमा परताव्याची 100 कोटी 61 लाख 14 हजार 593 इतकी रक्कम मंजूर
आंबा, काजूच्या विमा परताव्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या बागायतदारांसाठी खुशखबर असून रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना विमा परताव्याची 100 कोटी 61 लाख 14 हजार 593 इतकी रक्कम मंजूर झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 36 हजार 468 आंबा-काजू बागायतदारांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे. टप्प्याटप्याने रक्कम जमा होईल. विमा परतावा मिळाल्यामुळे बागायतदारांत आनंदाचे वातावरण आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात वातावरण बदलामुळे आंबा-काजू बागायतदारांचे होणारे नुकसान भरून निघावे यासाठी केंद्र-राज्य सरकारने फळपीक विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 30 हजार 135, तीन हजार 333 काजू बागायतदारांनी विमा उतरवला होता.



