
बालगृहामध्ये दिवाळी आनंदात
रत्नागिरी, दि. 24 ) : जिल्ह्यातील बालगृहामध्ये यंदाची दिवाळी आनंदात, उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य न्यायदंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस. पिंगळे, कामगार न्यायालय आणि सह दिवाणी न्यायाधीश एस. वी. जोशी, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १ आणि बाल न्याय मंडळ अध्यक्ष श्रीम. ए. डी. गाडे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर न्यायदंडाधिकारी वर्ग १ श्रीम. एस. वाय. शेख यांनी बालगृहातील मुलांना दिवाळी निमित्त मिठाई, सुकामेवा, उटणं आणि दिवाळीचे इतर साहित्य, शैक्षणिक साहित्य वाटप करुन बालकांचा आंनद व्दिगुणीत केला.
यावेळी त्यांनी बालगृहातील मुलांनी तयार केलेले आकाश कंदिल, पणत्या, ग्रिटिंगकार्ड आदी हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनास मान्यवरांनी भेट देवून मुलांचे कौतुक केले. या प्रदर्शनातील साहित्यांची खरेदी करुन बालकांचा उत्साह अधिक वाढवला.
मुख्य न्यायदंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीम. पिंगळे यांनी बालगृहातील ० ते १८ वयोगटातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसोबत कुटूंबाप्रमाणे दिवाळी साजरी करताना धोकादायक फटाक्यांचा वापर न करता आनंदी वातावरणात उत्साहात दिवाळी साजरी करण्याचा सल्ला दिला.
कामगार न्यायालय आणि सह दिवाणी न्यायाधीश श्री. जोशी यांनी दिवाळी हा सणांचा राजा आहे. त्यामुळे या सणाचा आनंद मनमुराद घेऊन किल्ले बनविणे या स्पर्धेत मुलांनी सहभाग घेऊन स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १ आणि बाल न्याय मंडळ अध्यक्ष श्रीम. ए. डी.गाडे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बाल कल्याण समिती सदस्य यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल न्याय मंडळ सदस्या अॅड. विनया घाग तर सूत्रसंचालन निरीक्षणगृह – बालगृह – शिक्षक विनोद पोवारव आभारप्रदर्शन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृध्दी वीर यांनी केले.
कार्यक्रमाकरीता बाल न्याय मंडळ सदस्या अॅड. विनया घाग, न्यायालयीन कर्मचारी, संस्था अधिक्षक, संध्या सुखटणकर – सामाजिक कार्यकर्त्यासरोज भाटकर – वकिल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन रत्नागिरीचे कर्मचारी उपस्थित होते.
000




