
निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय! आता संपूर्ण देशभर ‘SIR’ लागू होणार
निवडणूक आयोगाने मतदार याद्या पडताळणीची मोहीम (SIR) आता देशभरात राबवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना SIR ची तयारी जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.यामुळे बिहार आणि बंगालमध्ये मतदारयाद्या पडताळणीवरून गोंधळ घालणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. दोन दिवस चाललेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने अखेर हा निर्णय जाहीर केला आहे.
आयोगाने प्रत्येक राज्याला मतदार यादीत नवीन नावे जोडण्याचे, जुनी नावे काढून टाकण्याचे आणि पात्रता तारीख अंतिम करण्याचे काम सोपवले आहे. तसेच या बैठकीत मतदार यादीत दुरुस्ती करण्यासाठी घरोघरी पडताळणी आणि सार्वजनिक मोहिमांवरही चर्चा करण्यात आली.निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितले की, सर्व CEOsनी त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये एसआयआरची तयारी लवकर पूर्ण करावी. हे साध्य करण्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क ठेवण्यात आले आहे. आयोगाने गेल्या SIRपासून झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि CEOsना सध्याच्या डेटाच्या आधारे मतदार याद्या अद्यतनित करण्याचे निर्देश दिले.
SIR ही मतदार यादी अद्ययावत करण्याची एक पद्धत आहे. यामुळे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मतदारांची अचूक गणना सुनिश्चित होईल, यामुळे ही मोहीम देशभरात राबविण्याची तयारी सुरू केली गेली आहे. निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट आगामी निवडणुकीत अचूक आणि पारदर्शक मतदान प्रणाली सुनिश्चित करणे आहे. म्हणून, सर्व मुख्य निवडणूक आयुक्तांना प्रत्येक टप्प्यावर सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. अशीही माहिती समोर आली आहे.




