
दुकाने उघडी, दारांना कुलूप नाही, तरीही होत नाही चोरी. या अनोख्या गावाची संपूर्ण भारतात होतेय चर्चा
दररोज चोरी, फसवणूक, पैसे लुबाडण्याच्या घटना घडत असतात. मात्र भारतात असे एक गाव आहे जे आपल्या इमानदारीसाठी ओळखले जाते. नागालँडमधील खोनोमा हे गाव खूप खास आहे. या गावात अनेक दुकाने आहेत, मात्र त्यात सामान देण्यासाठी तिथे दुकानदार नसतो, तसेच या गावातील दुकानांना कुलूपही नसते.नागालँडमधील खोनोमा गावातील दुकानांना कुलूप लावले जात नाही. इथे कधीही फसवणूक किंवा चोरी होत नाही, त्यामुळे हे गाव प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेसाठी ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून दुकानदार नसलेली दुकाने आहेत. ग्राहक स्वतःचे सामान घेतात आणि योग्य रक्कम तिथे सोडून निघून जातात. या ठिकाणी कधीही चोरीचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे या गावाचा उल्लेख प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून केला जातेखोनोमा हे गाव प्रामाणिकपणा, सौंदर्य आणि स्वच्छ वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथील लोकांना कोणतीही भीती नसते. येथील दुकानांमध्ये वस्तू आणि इतर ग्राहकांना सोडलेले पैसे असतात. हे पैसे आणि सामान सुरक्षित असते. येथील गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, इतरांची फसवणूक करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे कोणीही चोरी करत नाही. त्यामुळे संपूर्ण देशात या गावाची चर्चा होत आहे. तसेच खोनोमा हे भारतातील पहिले हिरवे गाव म्हणूनही ओळखले जाते. या गावातील लोक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. या गावाला भेट देण्यासाठी भारतासह परदेशातूनही पर्यटक येत असतात.




