
जि.प.शाळा पूर्णगड नं.१ शाळेत दुर्गोत्सव उपक्रम उत्साहात…

रत्नागिरी : युनेस्कोने शिवछत्रपतींच्या बारा दुर्गांना जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. त्यांना जनसामान्यातून एक अभूतपूर्व मानवंदना देण्यासाठी जि. प. शाळा पूर्णगड नं. १ (ता. जि. रत्नागिरी) या शाळेने विद्यार्थी व पालकांच्या साह्याने मातीपासून आकर्षक किल्ले तयार करून त्याचे सेल्फी शासनाने दिलेल्या लिंकवर अपलोड करून प्रमाणपत्रे घेण्यात आली. या उपक्रमात शाळेने खारीचा वाटा उचलला आहे. या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी या सर्वांचे मोठे सहकार्य लाभले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे केंद्रप्रमुख श्री. राणे, शिक्षण विस्तार अधिकारी बीट पावस श्रीमती हिरवे यांनी समाधान व्यक्त केले.




