
खड्ड्यात आपटल्याने एसटीच्या आपत्कालीन दरवाजातून बाहेर फेकल्या गेलेल्या ’त्या’ प्रवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
गुहागर गणेशखिंडमार्गे रत्नागिरीच्या दिशने जाणार्या एसटीचा अचानक आपत्कालीन दरवाजा उघडून बाहेर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रियंका विनोद कुंभार ३५, दहिवली-कुंभारवाडी) यांचे अखेर मंगळवारी निधन झाले. अपघातानंतर खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या प्रियांका यांची गेल ३ दिवस जीवन मृत्यूशी सुरू असलेली झुंज मंगळवारी मध्यरात्री अपयशी ठरली. या अपघातप्रकरणी यापूर्वीच एसटी चालकासह वाहकावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुहागर रत्नागिरी या एसटीमधून सविता करंजेकर व प्रियांका कुंभार या दोघी रविवारी दहिवली खुर्द आंबाफाटा थांबा येथून सावर्डे येथे प्रवास करत होत्या. अशावेळी बस खड्ड्यात आदळून आपत्कालीन दरवाजा उघडला. त्यातून कुंभार या बाहे फेकल्या गेल्याने त्याच्या डोक्यास व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली त्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पती, दोन लहान मुले असा परिवार आहे.
www.konkantoday.com



