
कुरधुंडा ग्रामपंचायत सरपंच नाझिमा रमजान गोलंदाज यांना शिवसेना पक्षाच्या वतीने मुचरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्याची मागणी…
📍संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायत सरपंच सौ. नाझिमा रमजान गोलंदाज (बांगी) यांच्या कार्याचा गौरव करत, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने मुचरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
सामाजिक, शैक्षणिक आणि महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत असलेल्या सौ. नाझिमा गोलंदाज. (बांगी) यांनी ग्रामीण भागातील विकासकामांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना जिल्हा पातळीवर संधी मिळावी, अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात आहे.
सौ. नाझिमा गोलंदाज. (बांगी) या गेल्या १० वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर सदस्य, उपसरपंच ते सरपंच अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. प्रशासनाशी समन्वय साधत त्यांनी ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
स्थानिक पातळीवर मजबूत जनाधार असलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सौ. गोलंदाज.(बांगी) यांना आता जिल्हा पातळीवर संधी देऊन कार्य करण्याची संधी मिळावी, अशी एकमुखाने मागणी व्यक्त होत आहे.
त्या ‘नवनिर्मिती फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले असून, महिलांमध्ये स्वावलंबन आणि शिक्षणाविषयी जनजागृती घडवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
सौ.नाझिमा गोलंदाज (बांगी)या गेल्या १० वर्षांपासून शिवसेना पक्षाच्या महिला शाखा प्रमुख पदाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्याचे कार्य करत आहेत. पक्षनिष्ठा आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व या गुणांमुळे त्या संगमेश्वर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
तसेच त्या ‘नवनिर्मिती फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले असून, ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.




