
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे काळजाई मंदिर येथे अवजड वाहनांमुळे भाविकांच्या मार्गात अडथळ्यांचा स्पीडब्रेकर
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील काळकाई मंदिरासमोरील रस्त्यालगत सर्रासपणे अवजड वाहतुकीची वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे या हा परिसर वाहनतळ बनला आहे. यामुळे वाहनचालकांसह भाविकांच्या मार्गात स्पीडब्रेकर उभा ठाकला आहे. यामुळे अपघाताचा धोकाही कायम असताना भरणे ग्रामपंचायतीने हाताची घडी अन तोंडावर बोट ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रश्नी पोलीस यंत्रणेने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
श्रीदेवी काळकाई देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक येथे येतात. श्री देवी काळकाई मंदिर व्यवस्थापनाने भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था मंदिरासमोरील प्रशस्त जागेत केली आहे. याच काळकाई मंदिरासमोरील महामार्गालगत देवीचे छोट्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. याच ठिकाणी रस्त्यालगत डंपर, खासगी आराम बस, ट्रक व अन्य वाहने उभी केली जात आहेत.www.konkantoday.com




