
दापोली येथे असलेल्या एका नामांकित दुकानातून घेतलेल्या बनपावमध्ये बुरशी आढळल्याने ग्राहकांमध्ये संताप
दापोली एसटी स्टँड येथे असलेल्या एका नामांकित दुकानातून घेतलेल्या बनपावमध्ये बुरशी आढळल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी अशा दर्जाहीन वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्याने अन्नसुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.22 ऑक्टोबर रोजी एका ग्राहकाने संबंधित दुकानातून बनपाव खरेदी केला. मात्र, घरी आल्यानंतर पाव खाण्यास घेतला असता त्यात बुरशी असल्याचे आढळलेनागरिकांनी प्रशासनाने तातडीने या दुकानाची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. “ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.




