
चिपळूण-मुंढे गावातील शेतकरी मनोहर मोहिते यांच्याकडे असलेला व शर्यतीचे मैदान गाजवलेल्या कोश्या बैलाचा मृत्यू
गेल्या २ दशकाहून अधिक बैलगाडा शर्यतीचे मैदान गाजवणार्या मुंढेतर्फे चिपळूण येथील रहिवासी व जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे माजी सभापती मनोहर मोहिते यांचे बंधू बैलगाडा चालक दिवंगत वसंत मोहिते यांच्या कोश्या नामक बैलाचा नुकताच वृद्धापकाळाने मृत्यू झाला. कोश्याच्या मृत्यूने तळसर मुंढे पंचक्रोशीत बैलगाडा चालक व शेतकर्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोहिते यांच्या अनेक वर्षापासून खिल्लारी बैलजोड्या तसेच बैलगाडा आहे. मोहितेंच्या पश्चातही कुटुंबियांनी बैलांचे पालन पोषण सुरूच ठेवले. पंचक्रोशीतील एक नामवंत व मोठे शेतकरी म्हणून ह कुटुंब ओळखले जाते. बैलगाडी व बैलगाडी शर्यतीची प्रचंड आवड या कुटुंबाला होती. त्यामुळे त्यांनी निरनिराळ्या बैल जोड्या आपल्या हयातीत वापरल्या. त्यापैकी अगदी सुरूवातीपासून आपल्या कुटुंबात सांभाळलेला कोश्या हा एक महत्वाचा बैल होता. गेली २०-२५ वर्षे तो बैलगाडी शर्यतीच्या रणांगणावर कायम टक्कर देत होता. केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीमध्ये तो उतरला होता. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मैदाने या कोशाने गाजवली आहेत.
www.konkantoday.com




