
राजापूर शहराच्या दूरगामी विकासाची संकल्पना कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून राबवण्यासाठी कटीबध्द -ऍड. जमीर खलिफे
राजापूर नगर परिषदेची निवडणूक केव्हाही होवो, निवडणुका येतात आणि जातात असेही म्हटले जाते. मात्र तशी फिकरी न दाखवता आगामी न.प.ची निवडणूकदेखिल राजापूर शहराच्या रचनात्मक विकासासाठी आणि भावी पिढीच्या दूरगामी भविष्यासाठी महत्वपूर्ण आहे. कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी आ. ऍड. हुस्नबानू खलिफे आणि आपल्या नगराध्यक्षपदाच्या कालावधीत सहकार्यांच्या सहकार्यातून झालेली ठोस सार्वजनिक विकास कामे आजही शहराच्या दृष्टीने कालानुरूप महत्वपूर्ण ठरलेली विकास कामे आहेत, असे मत माजी नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी व्यक्त केले.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संबाद साधताना शहरवासियांना शुभेच्छा दिल्या आणि आपली भविष्यकालीन वाटचाल यावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की हजारो-लाखो रूपयांच्या शासकीय खर्चाच्या भ्रामक विकासापेक्षा राजापूरकर जनतेची आज जी गरज आहे त्या विकास कामांना प्राधान्य देण्याच्या धोरणाची आज गरज आहे. वर सत्ता कोणाची आहे हा सतत बदलणारा विषय असू शकतो. मात्र आपल्या शहराच्या दूरगामी विकासाची संकल्पना आपल्या स्तरावर संपूर्ण शहरवासियांच्या विचारांतून स्पष्ट असणे आवश्यक आहे.www.konkantoday.com




