
मुंबई गोवा महामार्गावर ओणी जवळ दुचाकी अपघातात, दुचाकी स्वाराचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावर ओणी जवळ दुचाकी स्वराचा दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला अपघात
राजापूर तालुक्यातील ओणी येथील गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ सोमवारी रात्री झाला अपघातात कोदवली येथील ४८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. संजय पुनाजी मांडवे (वय ४८, रा. कोदवली, मांडवेवाडी, ता. राजापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
संजय मांडवे हे त्यांची होडा शाईन कंपनीची मोटारसायकल (क्र. एम.एच.०१ ए.डब्ल्यू २८३०) घेऊन ओणी ते कोदवली असा प्रवास करत होते. महामार्गावरील रस्ता सरळ असतानाही आरोपी असलेल्या संजय मांडवे यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत, हयगयीने आणि भरधाव वेगाने बेदरकारपणे दुचाकी चालवली. त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. यात संजय मांडवे यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.




