
मा.प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब व जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप महायुतीकडून दिवाळी शुभेच्छा अभियान व नागरिक संवाद कार्यक्रम
भारतीय जनता पार्टी मा. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष महायुती प्रभाग क्रमांक १ तर्फे दिवाळी शुभेच्छा अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत पक्षाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
या प्रसंगी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी प्रभागातील नागरिकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान प्रभाग क्रमांक १चे शक्ती केंद्रप्रमुख नितीन जाधव बुथ प्रमुख राकेश सुवारे, मंदार खंडकर, संदीप मांडवकर, निलेश मराठे यांच्यासह प्रभागातील विविध बूथप्रमुखांशी चर्चा करून नागरिकांच्या समस्या, अपेक्षा तसेच निवडणुकीसंदर्भातील तयारीबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या मतांची देवाणघेवाणही करण्यात आली.
या वेळी प्रणाली रायकर, सोनाली केसरकर, भक्ती दळी, प्रज्ञा टाकळे, कामना बेग, सारिका शर्मा, संतोष सावंत, प्रसाद बाष्ट्ये, नितीन गांगण, संदीप सुर्वे, निलेश आखाडे आणि संदीप रसाळ रायकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या उपक्रमास रवींद्र चव्हाण साहेब आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील संघटनात्मक काम अधिक जोमाने सुरू असल्याचे शहराध्यक्षांनी सांगितले. आगामी निवडणुकांनिमित्त पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.




