
महाबळेश्वरमध्ये वेण्णालेक येथे पर्यटकांची अडकलेली बोट सुखरूप
महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगामामुळे पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. शहराचेप्रमुख आकर्षण असलेल्या वेण्णालेक परिसरात नौकाविहारासाठी गर्दी होत आहे. सोमवारी काही पर्यटक बोटींग करत असताना त्यांची बोट झाडाच्या फांद्यांमध्ये अडकली. यावेळी पाहणीसाठी आलेल्या मुख्याधिकाऱ्यांना ही बाब समजताच त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. यावेळी पर्यटकांना दुसऱ्या बोटीत बसवून त्यांना रेस्क्यू करण्यात आले.
वेण्णालेक येथे एक दांपत्य, एक कुटुंब असे दोन पॅडल बोटमधून नौकाविहाराचा आनंद घेत होते. जोरदार वाऱ्यामुळे या दोन्ही पॅडल बोट वेण्णा तलावाच्या एका बाजूला असलेल्या जुन्या स्मशानभूमी परिसरातील झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्याने पर्यटक काहीशे घाबरले. प्रयत्न करूनही बोटी बाहेर येत नव्हत्या.
दरम्यान वेण्णालेक येथे नव्याने तरंगत्या जेट्टीची पाहणुी करण्यासाठी आलेल्या मुख्याधिकारी यांनी स्वत: रेस्क्यू बोट चालवत बचावकार्यात सहभाग घेतला. यावेळी पालिकेचे लिपिक आबाजी ढोबळे, सचिन दीक्षित, फारूख महाबळे, रमेश आखाडे यांनी सहभाग घेतला.




