
दिवाळी सणावर अवकाळी पावसाचे सावट कायम
नैऋत्य मोसमी पावसाने
माघार घेतल्यानंतरही पाऊस महाराष्ट्राचा पिच्छा सोडयला तयार नाही. बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात नागरिकांची चिंता वाढली आहेकारण, या अवकाळी पावसाचे सावट थेट दिवाळीवर कायम आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, थेट 25 ऑक्टोबरपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा कायम आहे. कोकण गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात या काळात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




