
कोकण रेल्वे मार्गावरील कळंबस्ते येथील रेल्वे फाटक पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे अडकले, वाहनधारकांची गैरसोय
कोकण रेल्वे मार्गावरील कळंबस्ते येथील रेल्वे फाटक आज परत एकदा तांत्रिक बिघाडामुळे अडकले मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा फाटक अडकल्यामुळे परिसरात ट्रॅफिक जॅम निर्माण झाला. या फटका बाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आला असून हे फाटक अडकण्याचे यादीही प्रकार उघडलेले आहेत कधी फाटक अडकते तर कधी फाटक खाली येत नाही त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो
या सर्व प्रकारामुळे स्थानिकांचे आणि वाहनचालकांचे मोठे गैरसोय होते या फटकाचे तातडीने दुरुस्तीची मागणी केली जात आहे. शौकत मुकादम यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटले की, “जर दुरुस्ती अभावी अपघात घडला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कोकण रेल्वे प्रशासनाची राहील.”
मुकादम पुढे म्हणाले की कळंबस्ते येथे रेल्वे फाटक असल्याने उड्डाण पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे, पण अद्याप ती पूर्ण झालेली नाही.




