
महाराष्ट्रातील एकमेव फ्री -डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून बहुमान चिपळूणच्या समृद्धी देवळेकर हिला मिळाला
महाराष्ट्रातील एकमेव फ्री -डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून हा बहुमान समृद्धी देवळेकर हिला मिळाला आहे. चिपळूणचे उबाठा शिवसेना पक्षाचे माजी शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक राजू देवळेकर यांची ती कन्या आहे.चिपळूणची लेक आणि कोकणातील चिपळूणची सुकन्या समृद्धी राजू देवळेकर हिने आपल्या ध्येय, मेहनत आणि निसर्गप्रेमाच्या जोरावर चिपळूणचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. समृद्धी आता प्रमाणित झ-ऊख फ्रीडायव्हिंग इन्स्ट्रक्टर बनली असून, अशी मान्यता मिळवणार्यांपैकी ती भारतातील मोजक्या व्यक्तींमध्ये एक आहे. समृद्धी सध्या एका श्वासावर तब्बल 120 फूटांहून अधिक खोल डाइव्ह करू शकते आणि 4 मिनिटांहून अधिक वेळ श्वास रोखून ठेवू शकते.ही एक अतुलनीय आणि अत्यंत दुर्मिळ क्षमता आहे. समृद्धीचं आयुष्य सुरुवातीला आकाशाशी जोडलेलं होतं. ती एक ट्रेनी पायलट होती. पण पंखांमधून पाण्यात उतरलेली तिची ही जीवनकथा फारच अद्वितीय आहे. समुद्राने तिला बोलावलं आणि एकदा तिचा पाय खोल समुद्रात गेला की तिने मागे वळून पाहिलंच नाही. त्या क्षणापासून तिने आपलं आयुष्य फ्रीडायविंगसाठी समर्पित केलं. नुकतीच ती फिलिपिन्समधून? ? आंतरराष्ट्रीय पातळीवर फ्रीडायविंग कोर्सेस व कार्यशाळा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील डायव्हर्स ऑफ विंगोरीय यांच्यासोबत प्रशिक्षण देण्यासाठी दाखल झाली आहे. तिच्याकडे भारत आणि जगभरातून विद्यार्थी येतात. खोल पाण्याशी एकरूप होण्यासाठी, श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या मर्यादा ओळखून त्याही पुढे जाण्यासाठी.
समृद्धीचा ठाम विश्वास आहे की, भारतीयांमध्ये फ्रीडायविंगसाठी अपार क्षमता आहे. आपल्याकडे असलेली मानसिक शांतता, योगाभ्यासाची परंपरा, शारीरिक सहनशक्ती आणि आत्मनियंत्रण या सर्व गुणांमुळे आपण या खेळात जागतिक स्तरावर आघाडी घेऊ शकतो.




