
परतीचा अवकाळी पाऊस आल्याने लक्ष्मीपूजनाच्या आनंदावर विरजण, विद्युत पुरवठा ही खंडित
रत्नागिरी शहरात आज सकाळपासून चांगली उघाडी असताना सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आज लक्ष्मीपूजन असल्याने बाजारपेठेत फुलांचे व फटाके अन्य स्टॉल उभारले होते तसेच व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजनाची ही तयारी केली होती मात्र वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे शहरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला सायंकाळच्या वेळेस व्यापारांचे लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमास उत्साह असतो मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे व पावसामुळे या सर्वांच्या आनंदावर विरजण पडले आहे रत्नागिरी शहराच्या आजूबाजूला वादळी पावसाने हजेरी लावली आहे रत्नागिरी शहर परिसर अंधारात जाण्याचे कारण म्हणजे भोके येथे असलेल्या विजेच्या टॉवरवरील इन्सुलटर जळले आहेत त्यामुळे हा विद्युत पुरवठा खंडित झाले असल्याचे कळते




