
बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा…
भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बालभारती पब्लिक स्कूल, अंजनवेल येथे “वाचन प्रेरणा दिन” उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य सुरजीत चटर्जी यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या विचारांवर आधारित वाचन प्रेरणा दिन या विषयावर प्रभावी सादरीकरण केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. तसेच इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी “वाचनाचे महत्त्व” या विषयावर सादर केलेली नाटिका विशेष आकर्षण ठरली.
या दिनानिमित्त शाळेच्या ग्रंथालय विभागातर्फे “DEAR” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत वाचनाचे महत्त्व जाणून घेतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य दिले.




