
नवोदय परीक्षेत जय रांगणकरचे सुयश
राजापूर : जवाहर नवोदय विद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत जय प्रणोती राजेंद्र रांगणकर याने सुयश मिळवले असून त्याची निवड पडवे (ता. राजापूर) या विद्यालयात झाली आहे.
जय हा रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलचा विद्यार्थी असून, त्याच्या यशात या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याला त्याचे वडील राजेंद्र रांगणकर, आई प्रणोती रांगणकर, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांचा भक्कम पाठिंबा लाभला. त्याच्या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




