
दिवाळीची पहाट आनंदाने साजरी करण्यासाठी स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब व भारतीय जनता पार्टी,कुवारबाव तर्फे दिवाळीची भेट…
दिवाळीची पहाट आनंदाने साजरी करण्यासाठी स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब व भारतीय जनता पार्टी,कुवारबाव तर्फे श्री.सतेज नलावडे यांनी गावातील १००-१२० गरजू कुटुंबाना दिवाळीची छोटी भेट दिली.

या मधे दिवाळीचा फराळ,ऊटण,मोती साबण,फुलबाजे व लाइटिंग माळ या वस्तू देण्यात आल्या.वरील सर्व भेट वस्तूंचे नियोजन सिंधू फुड्स( सिंधु स्वयंसहायता महिला समूह) यांनी केले त्याबद्दल क्लबने त्यांचे आभार व्यक्त केले.
या भेट वितरण समयी ओमकार फडके,नितिश आपकरे,रसिक कदम,चंद्या गराटे,प्रियल जोशी,दीपक आपटे,नेहा आपकरे, योगेश गराटे,रतन माने उपस्थित होते.या भेटीबद्दल ग्रामस्थानी आभार व्यक्त केले.





