
लांजा फ्रेंड्स ग्रुपच्यावतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून फ्रेंड्स ग्रुप प्रज्वलित करणार २० हजार २२० दीप
लांजा फ्रेंड्स ग्रुपच्यावतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून २१ ऑ *क्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी २० हजार २२० दीप एकाचवेळी प्रज्वलित करण्यात येणार आहेत.
फ्रेंड्स ग्रुपच्यावतीने साजरा करण्यात येणारा दीपोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा दीपोत्सव म्हणून ओळखला जातो. या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे जसजसे या दीपोत्सव कार्यक्रमाला वर्ष होत गेली तसतसा या उत्सवात प्रज्वलित करण्यात येणार्या दीपांची संख्यादेखील वाढत गेली आहे. या प्रकाशमय आनंद सोहळ्याला लांजावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विजय हटकर यांनी फ्रेंड्स ग्रुपच्यावतीने केले आहे.
www.konkantoday.com




