
नियम मोडणाऱ्या वाहन 3 हजार 452 दोषी वाहनांवर कारवाई
रत्नागिरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत नियमितपणे वाहनांची तपासणी केली जाते. दरम्यान, एप्रिल 2025 ते सप्टेंबर या कालावधीत वाहतून नियमांचे उल्लंघन करणार्या 3 हजार 452 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली.या कारवाईतून 1 कोटी 63 लाख 10 हजार रुपयांचा दंड व 7.25 लाख इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे; अन्यथा यापुढेही दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.




