
चिपळूण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रमेशभाई कदम यांच्या नावावर ’शिक्कामोर्तब’, कार्यकर्त्यांचा निर्धार
आगामी चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. गुरूवारी पार पडलेल्या शहरातील पक्ष पदाधिकार्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार आणि चिपळूणचे ’जाणता राजा’ अशी ओळख असलेले रमेशभाई कदम यांच्या नावावर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सर्वानुमते ’शिक्कोमोर्तब’ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे चिपळूणच्या स्थानिक राजकारणात एक निर्णायक पाऊल उचलले असून, आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
’जनतेने आग्रह केल्यास मी पुन्हा निवडणूक लढवेन’, असे जाहीर वक्तव्य करून माजी आमदार रमेशभाई कदम यांनी चिपळूणच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यातच चिपळूण नगराध्यक्षपदाचे आरक्षणा सर्वसाधारण वर्गासाठी पडल्याने जणू त्यांना ’लॉटरी’च लागल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते.
www.konkantoday.com




