
राजापूर शहरातील रानतळे येथील महाविद्यालयातील बेदरकार वाहने चालवणार्या विद्यार्थ्यांवर पोलीसी कारवाई
राजापूर शहरातील रानतळे येथील येथील महाविद्यालयातील काही विद्यार्थी विनापरवाना वाहने आणत असल्याबद्दल आणि ती भरधाव धूम स्टाईलने चालवून इतरांना त्रास देत तसेच जीवाशी खेळत असल्याबद्दल राजापूर पोलीस ठाण्यात महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या तक्रार अर्जानुसार राजापूर पोलीसांनी १४ ऑक्टोबर रोजी धडक मोहीम’ राबविली.
या मोहिमेदरम्यान राजापूर पोलीस ठाणे येथील वाहतूक अंमलदार दीपक करजवकर आणि नितीन फाळके यांनी तत्परता दाखवत एकूण २७ अल्पवयीन विद्यार्थ्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com




