
पाकिस्तानचा पुन्हा एअरस्ट्राईक, खेळाडूंवर टाकले बॉम्ब, ८ अफगाण खेळाडूंचा मृत्यू
पाकिस्तान आणि अफगानिस्तान या दोन देशांमध्ये युद्धाची स्थिती तयार झाली आहे. सिझफायर असतानाही पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमध्ये एअरस्ट्राइक करण्यात आला आहे.पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या आठ खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय अनेकजण जखमी आहे. अफगाणिस्तान बोर्ड अन् दिग्गज खेळाडूंनी याबाबत एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू झालेले सर्व खेळाडू सामना संपल्यानंतर घराकडे निघाले होते. त्याचवेळी पाकिस्तानकडून बॉम्ब टाकण्यात आले. युद्धबंदी असूनही पाकिस्तानकडून हल्ला झाल्याने दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहचला आहे.अफगानिस्तान क्रिकेट बोर्ड या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू झालेले ८ खेळाडू क्लब लेव्हलचे क्रिकेटर होते. अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांच्या हवाल्याने टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अफगानिस्तानमधील पक्तिका परिसरात पाकिस्तानच्या हवाई दलाने बॉम्ब फेकले. या हल्ल्यात स्थानिक एका क्लबलचे आठ खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. अन्य काही खेळाडू जखमी झाले आहे. हे खेळाडू सामना संपल्यानंतर आपल्या घराकडे निघाले होते. पण वाटेतच पाकिस्तानच्या हल्ल्यात त्यांचा जीव गेलापाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेल्या अफगान खेळाडूंच्या मृत्यूवर अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने दु:ख व्यक्त केले आहे. अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने एक्स खात्यावर खेळाडूंना श्रद्धांजली अर्पण केली आहे. संध्याकाळी पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या भ्याड हल्ल्यात पक्तिका प्रांतातील उर्गुन जिल्ह्यातील क्रिकेटपटूंच्या मृत्यूबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड तीव्र दुःख व्यक्त करत आहे.




