
रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळेतील त्या वादग्रस्त शिक्षिकेची अखेर बदली.
रत्नागिरी शहरातील नगर परिषदेच्या निवखोल शाळेतील गेल्या २ दिवसांपासूनचा विद्यार्थीनींना सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात आणि दमदाटी करतात, असा आक्षेप घेत पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला होता. मात्र प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे व संबंधित शिक्षिकेच्या बदलीच्या निर्णयामुळे हा प्रश्न निकाली निघाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.गेले २ दिवस विद्यार्थी शाळेत येत नसल्याने शिक्षकांविना वर्ग सुरू होते. पालकमंत्री संबंधित शिक्षिकेची बदली झाल्याशिवाय मुलांना शाळेत पाठवणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. या गंभीर तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली होती. शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी एस. जे. मुरकुटे यांनी स्वतः नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना यासंदर्भात अहवाल सादर केला. पालकांचा तीव्र विरोध लक्षात घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत वादग्रस्त शिक्षिकेची अन्यत्र बदली करण्याचा निर्णय घेतला.www.konkantoday.com



