
चिपळुणात जिकडे तिकडे चोहीकडे, फटाकेच फटाके
सध्या शहरासह खेर्डी परिसराचा विचार करता दिवाळीसाठी लागणार्या साहित्याच्या दुकानांपेक्षा फटाक्यांचे स्टॉल अधिक असल्याचे भयावह चित्र पहायला मिळत आहे. राजकीय आशीर्वादामुळे तरुणांनी जिकडे तिकडे चहूकडे म्हणत रस्त्यांच्या कडेलाच आपले स्टॉल उभारले आहेत. यातील ९० टक्के स्टॉल अनधिकृत आहेत. कोणाकडेही जिल्हाधिकार्यांकडून घेतलेली परवानगी नाही. तरीही नगर परिषद, पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.www.konkantoday.com




